पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सागरी दिनाच्या निमित्ताने भारताच्या समृद्ध सागरी वारशाची आठवण करून दिली तसेच या क्षेत्राशी संबंधित सर्वांच्या अमूल्य योगदानाची दखल घेतली.
पंतप्रधानांनी नमूद केले की सागरी क्षेत्रात कार्यरत व्यक्तींची समर्पित भावना देशाची अर्थव्यवस्था, व्यापार आणि संपर्कव्यवस्था अधिक मजबूत करते.
राष्ट्राच्या समृद्ध भविष्यासाठी सागरी क्षेत्रातील अपार क्षमतेचा प्रभावी वापर करण्याप्रति सरकारची वचनबद्धता त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.
पंतप्रधानांनी ‘एक्स’वर लिहिले:
“राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त आपण भारताच्या सागरी वारशाची आणि या क्षेत्राशी संबंधित सर्वांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण करतो. त्यांच्या समर्पणामुळे आपली अर्थव्यवस्था, व्यापार आणि संपर्क अधिक बळकट होतो.
आपल्या सागरी क्षेत्रातील अपार क्षमतेचा उपयोग करून समृद्ध भविष्य घडविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.”
On National Maritime Day, we recall India’s maritime heritage and the invaluable contribution of all those associated with this sector. Their dedication strengthens our economy, trade and connectivity.
We will continue to harness the immense potential of our maritime sector for… pic.twitter.com/b9Uae4alCs
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2026
***
सुषमा काणे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com