Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रिओ ऑलिंपिकला जाणाऱ्या भारतीय क्रीडापटूंना पंतप्रधानांच्या ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा

रिओ ऑलिंपिकला जाणाऱ्या भारतीय क्रीडापटूंना पंतप्रधानांच्या ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा


रिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय क्रीडा चमूची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. यावेळी 60 पेक्षा अधिक खेळाडू उपस्थित होते. खेळाडूंशी अनौपचारिक बातचीत करुन पंतप्रधानांनी प्रत्येक खेळाडूला शुभेच्छा दिल्या. या संदर्भातील क्रीडापटूंबरोबरची छायाचित्रे पंतप्रधानांनी ट्विटर द्वारे प्रसारित केली आहेत.

यावेळी पंतप्रधानांनी क्रीडापटूंशी संवाद साधला तसेच त्यांच्याबरोबर “सेल्फी” ही काढले. काही खेळाडूंनी पंतप्रधानांशी केलेली बातचीत, छायाचित्रे समाजमाध्यमाद्वारे प्रसारित केली आहेत, त्यांचीही “रिट्विट” करुन पंतप्रधानांनी दखल घेतली. यामध्ये मनोज कुमार, योगेश्वर दत्त या खेळाडूंचा समावेश आहे.

S.Bedekar/Bhavna Gokhale