पीएम्इंडिया
टाटा कन्संलन्टन्सी सर्व्हिसच्या रियाध इथल्या महिलांच्या माहिती तंत्रज्ञान आणि आयटीईएस केंद्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली.
या केंद्राच्या कार्यपध्दतीची माहिती पंतप्रधानांना यावेळी देण्यात आली. महिला कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानांचं उत्साहानं स्वागत केल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्याशी संवाद साधला.
जगाला हा एक मोठा संदेश आहे की, सौदी अरेबियाच्या सन्मानाच्या दिशेने काम करणाऱ्या लोकांना आपण भेटत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितले.
सध्याच्या स्पर्धात्मक जगात अधिकाधिक प्रगतीसाठी आपली नैसर्गिक आणि मानवी ताकद एकवटायला हवी. नारी शक्ती, विकासाच्या वाटचालीतला एक भाग बनते तेव्हा त्याला नवी गती मिळते. या केंद्रातले वातावरण पाहिल्यानंतर ते जगासाठी एक सकारात्मक उर्जेचा अग्रदूत असल्याचं प्रतीत होत आहे असं पंतप्रधान म्हणाले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या महिलांनी भारताला भेट द्यावी असं निमंत्रण देतानाच यामुळे भारतातही मोठा चांगला परिणाम होईल असं पंतप्रधान म्हणाले.
प्रशासनातल्या तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर पंतप्रधानांनी भर दिला. ई-गव्हर्नन्स म्हणजे आपल्यासाठी सुलभ प्रशासन, प्रभावी प्रशासन आणि आर्थिक प्रशासन असल्याचं त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी ॲप पाहण्यासाठी पंतप्रधानांनी त्यांना आमंत्रित केले आणि भारतातल्या महिला सबलीकरणाबाबत आपले विचारही मांडले.
वंदे मातरम, मातृ देवो भव: असं पंतप्रधानांनी केंद्राच्या संदेश फलकावर लिहिले.
Talking e-governance at the TCS All Women IT & ITEs Center in Riyadh. pic.twitter.com/tMLEtxmG36
— PMO India (@PMOIndia) April 3, 2016
PM shares his message on the message board at the TCS Centre. pic.twitter.com/LTEJJ2gIq3
— PMO India (@PMOIndia) April 3, 2016
A warm welcome awaited PM @narendramodi at the TCS Centre. pic.twitter.com/rHMwKoHBXG
— PMO India (@PMOIndia) April 3, 2016