Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रेल्वे आणि रस्ते क्षेत्राचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

रेल्वे आणि रस्ते क्षेत्राचा पंतप्रधानांनी घेतला आढावा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महत्वपूर्ण रेल्वे आणि रस्ते या पायाभूत क्षेत्राच्या विकास कामांचा आढावा घेतला.

रेल्वे क्षेत्राचा आढावा घेताना हे लक्षात आले की, वर्ष 2015-16 मध्ये या क्षेत्रात 93,000 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यात आली जी मागील वर्षीपेक्षा 65 टक्क्यांनी तसेच आत्तापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक आहे. त्याचबरोबर, वर्ष 2015-16 मध्ये 1780 किलोमीटर लांब रेल्वे रुळाचे काम पूर्ण झाले असून 1730 किलोमीटर लांबीच्या रेल्वे रुळाचे विद्युतिकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या सर्व बाबी हेच दर्शवतात की, रेल्वेच्या इतिहासातील ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

रेल्वे स्थानकांचा जलदगतीने पुनर्विकास करण्यावर भर आणि याच अनुषंगाने रेल्वेने आपली ध्येय नेहमी उंच ठेवावीत अशी विनंती यावेळी मोदींनी केली. रेल्वेने आपल्या पायाभूत सुविधांना अद्ययावत आणि वैविध्यपूर्ण करण्याची आवश्यकता असण्यावर जोर दिला. ग्रामीण भागात रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा वापर कौशल्य विकासासारख्या उपक्रमासाठी करावा असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला.

रस्ते क्षेत्राच्या विकास कामांची माहिती देताना पंतप्रधानांनी सांगितले की, वर्ष 2015-16 मध्ये 6000 किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधले असून याच कालावधीसाठी 10,098 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे कंत्राट देण्यात आले आहे.

देशभरातल्या विविध रस्ते विकासाच्या आराखड्यांचा अभ्यास करुन चांगली पध्दती अवलंबण्यावर पंतप्रधानांनी यावेळी भर दिला जेणेकरुन महामार्ग बांधकाम क्षेत्रात अधिकाधिक खाजगी गुंतवणूक होईल.

टोल वसूलीकरीता किचकट पध्दती सोडून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरावर यावेळी मोदींनी जोर दिला.

S.Mhatre/B. Gokhale