पीएम्इंडिया
पात्र अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना (आरपीएफ/आरपीएसएफ वगळून) 2015-16 या वित्तीय वर्षासाठी 78 दिवसांच्या पगाराएवढा उत्पादकतेवर आधारित बोनस (पीएलबी) द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल तसेच रेल्वेच्या उत्पादकतेत भर पडायला मदत मिळू शकेल.
बोनस दसरा/पुजेच्या सुट्टीच्या आधी दिला जाईल.
N.Sapre/S. Kakade/P. Kor