Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रेल्वे क्षेत्रातल्या तंत्रविषयक सहकार्यासाठी भारत आणि स्विझर्लंड यांच्यातल्या सामंजस्य कराराबाबत मंत्रिमंडळाला माहिती


रेल्वे क्षेत्रातल्या तंत्रविषयक सहकार्यासाठी भारतातले रेल्वे खाते आणि आणि स्विझर्लंडचे पर्यावरण,वाहतूक आणि दळणवळण खाते यांच्यातल्या सामंजस्य कराराबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाला माहिती देण्यात आली.

31 ऑगस्ट 2017 ला या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

या सामंजस्य करारामुळे, ईएमयु आणि रेल्वे सेट्स, प्रवासी गाड्या आणि भाडे, रेल्वे विद्युतीकरण उपकरणे,रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण,बहुविध वाहतूक,बोगद्यांसाठीचे तंत्रज्ञान या विभागांत तांत्रिक सहकार्य केले जाईल.

N.Sapre/N.Chitale/Anagha