Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याविषयावरील भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे क्षेत्रात संयुक्त अरब अमिरातीच्या वाहतूक प्राधिकरण- भूमी आणि सागरी सोबत झालेल्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली. 10 फेब्रुवारी 2018 रोजी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

या करारामुळे खालील क्षेत्रात तांत्रिक सहकार्य शक्य होईल:-

• नियमन, सुरक्षा आणि अपघातांची तांत्रिक चौकशी

• स्टेशन पुनर्विकास

• लोकोमोटिव्ह, कोचेस आणि वॅगन,आणि

• भागीदारांनी संयुक्तपणे ओळखलेले इतर कोणतेही क्षेत्र.

फायदे:

हा सामंजस्य करार भारतीय रेल्वेला, रेल्वे क्षेत्रातील ताज्या घडामोडी व ज्ञान सामायिक करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देईल. या सामंजस्य करारान्वये माहितीचे आदान-प्रदान, तज्ज्ञ सभा,परिसंवाद,तांत्रिक भेटी आणि संयुक्त सहमती सहकार्य प्रकल्पांच्या अंमलबजावणी करणे सुलभ होईल.

पार्श्वभूमी:

रेल्वे मंत्रालयाने रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्यासाठी विविध परदेशीसरकारेआणि राष्ट्रीय रेल्वे क्षेत्रा सोबत सामंजस्य करार केले आहेत. रेल्वे तंत्रज्ञान आणि सहकार्य क्षेत्रातील विकासाच्या माहितीचे आदानप्रदान , ज्ञानाची देवाणघेवाण, तांत्रिक भेटी आणि परिसंवाद आणि परस्पर हिताच्या क्षेत्रांमधील कार्यशाळा या सर्व बाबींमुळे सहकार्य साध्य होते.

NS/SM/PK