पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या 61,000 हून अधिक तरुणांना 18 व्या रोजगार मेळ्यात नियुक्तीपत्रे वितरित करतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.
रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेचे रूपांतर कृतीत करण्यासाठी रोजगार मेळा या एका महत्वाच्या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या उपक्रमाच्या प्रारंभापासून आतापर्यंत देशभरात आयोजित होणाऱ्या अशा रोजगार मेळ्यांमध्ये 11 लाखाहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली गेली आहेत.
देशभरातील 45 ठिकाणी हा 18वा रोजगार मेळा आयोजित होणार आहे. भारताच्या सर्व भागांमधून निवड झालेले नवनियुक्त उमेदवार भारत सरकारच्या गृह तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आर्थिक सेवा विभाग, उच्च शिक्षण विभाग अशा अनेक मंत्रालये तसेच विभागांमध्ये कार्यरत होणार आहेत.
***
सुवर्णा बेडेकर/उमा रायकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai