Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रोहतक इथल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्‌घाटन समारंभाला पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहतक इथल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्‌घाटन समारंभाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.

युवा दशेतच एखादी व्यक्ती काय प्राप्त करू शकते याचे उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद यांचे जीवन होय. युवावर्ग सध्या जे काम करत आहे त्याने देशाचे भविष्य घडण्यासाठी मदत होणार आहे असे पंतप्रधान म्हणाले.

‘डिजिटल इंडियासाठी युवा वर्ग’ ही या महोत्सवाची संकल्पना असून त्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. रोकडरहित वाढत्या व्यवहारासंदर्भात युवावर्गाने जनतेला मार्गदर्शन करावे असे आवाहन त्यांनी केले. भ्रष्टाचार आणि काळा पैसा यामुळे देशाच्या प्रगतीवर विपरित परिणाम होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे काळ बदलला आहे. भ्रष्टाचाराविरोधातल्या लढ्यात युवकांच्या मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे देशात सकारात्मक बदल घडवणे शक्य असल्याची खात्री आपल्याला पटली आहे असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor