Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लखनौमध्ये ई-रिक्षा वितरण कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती; पंतप्रधानांनी रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबियांशी साधला संवाद

लखनौमध्ये ई-रिक्षा वितरण कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती; पंतप्रधानांनी रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबियांशी साधला संवाद


भारतीय मायक्रो क्रेडिटने लखनौमध्ये आयोजित केलेल्या ई-रिक्षा वितरण कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहिले.

यावेळी पंतप्रधानांनी रिक्षा चालकांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. या संवादादरम्यान पंतप्रधानांनी अतिरिक्त कमाईची बचत, मुलांचे शिक्षण आदि विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली.

आज सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे संपूर्ण जग पहात आहे, याचा उल्लेख यावेळी पंतप्रधानांनी केला.

जागतिक मंदी असून सुध्दा ही प्रगती होत असलयाचे त्यांनी सांगितले. गरिबांचे कल्याण आणि युवकांसाठी रोजगार हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. युवकांनी नोकऱ्या शोधण्यापेक्षा नोकऱ्या निर्माण केल्या पाहिजेत असे सांगत पंतप्रधान म्हणाले की यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु झाल्यापासून वर्षभरातच 2 कोटी लोकांना याचा लाभ झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

ज्या लोकांना आज ई-रिक्षा वितरित झाल्या आहेत, हा केवळ पेडल रिक्षा ते ई-रिक्षा असा साधा बदल नसून ही एक परिवर्तनीय प्रगती असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते निवडक लाभार्थ्यांना प्रतिकात्मक रुपे कार्ड आणि सामाजिक सुरक्षा योजना भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी पंतप्रधानांनी 2100 ई-रिक्षांच्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.

S.Kane/S.Tupe/M.Desai