Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लखनौ मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज लखनौ मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला (1-ए) मंजुरी दिली. 22.8 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात 22 स्थानके असतील आणि 3.4 किलोमीटरचा मार्ग भुयारी असेल.

या प्रकल्पाचा खर्च 6,928 कोटी रुपये असेल आणि भारत सरकार समभाग आणि कर्जाच्या स्वरुपात 1300 कोटी रुपयांचे सहाय्य देईल. लखनौ मेट्रो रेल-कॉर्पोरेशन (एलएमआरसी) या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यात 50:50 संयुक्त मालकी असलेली कंपनी म्हणून याची पुर्नस्थापना होईल.

(Release ID :133816)
S.Kane/S.Tupe/M.Desai