Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लिगो-इंडिया मेगा विज्ञान प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची तत्वत: मान्यता


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने, गुरुत्वाकर्षण लहरींवरील संशोधनाच्या लिगो-इंडिया मेगा प्रस्तावाला आज तत्वत: मंजूरी दिली. लिगो-इंडिया प्रकल्प (लेझर इंटफेरोमिटर ग्रॅव्हीएशन्ल “ वेव्ह ऑबझरव्हेटरी इन इंडिया) हा अणु ऊर्जा आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे राबवण्यात येणार आहे. गुरुत्वाकर्षण लहरीच्या संशोधनाला मान्यता देणे म्हणजेच विश्वाच्या गर्भातील अजून काही गूढ रहस्य उकलण्यासाठी एक खिडकी खुली करण्यासारखे आहे.

लिगो इंडिया प्रकल्प अमेरिकेतल्या लिगो प्रयोगशाळेच्या सहाय्याने भारतात अद्ययावत गुरुत्वाकर्षण लहरी वेधशाळेची स्थापना करणार आहे.

हा प्रकल्प वैज्ञानिक आणि अभियंत्यांना गुरुत्वाकर्षण लहरींच्या क्षेत्रात अनेक अभूतपूर्व संधी उपलब्ध करुन देऊन जगाच्या नेतृत्वाला खगोलशास्त्रीय व्यासपीठावर घेऊन जातील. लिगो इंडिया भारतीय उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानातल्या नवीन संधी उपलब्ध करुन देतील.

ज्ञानाच्या नवनवीन व्यासपीठाचा शोध लावण्यासाठी हा प्रकल्प भारतीय विद्यार्थ्यांना प्रेरणा देईल आणि देशाच्या वैज्ञानिक संशोधनात मोलाचे योगदान देईल.

S.Mahtre/S.Tupe/M.Desai