Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या स्नेहपूर्वक शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी मानले आभार


नवी दिल्ली, 10 जून 2026

 

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. भारतीय लोकशाहीतील हा ऐतिहासिक मैलाचा दगड म्हणजे जनतेकडून मिळत असलेले उदंड आशीर्वाद आणि प्रेम यांचा परिपाक आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

आपण सर्वजणांनी मिळून विकसित, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्याचा संकल्प अधिक दृढ निश्चयाने असाच पुढे नेत राहू, अशी दृढ भावनाही मोदींनी त्यांच्या या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.

‘एक्स’ वर लिहिलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान  म्हणतात:

“माननीय ओम बिर्ला जी, आपल्या स्नेहपूर्वक शुभेच्छांबद्दल खूप-खूप आभार. भारतीय लोकशाहीतील हा या ऐतिहासिक टप्पा म्हणजे जनता-जनार्दनाने दिलेले उदंड आशीर्वाद आणि त्यांनी दाखवलेल्या आपलेपणाचा परिणाम आहे. आपण सर्वांनी मिळून विकसित, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत निर्माण करण्याचा संकल्प आणखी दृढनिश्चयाने पुढे नेत राहू. 

@ombirlakota”

 

* * *

नेहा कुलकर्णी/मंजिरी गानू/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai