Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लोकसभेतील संविधान दिनावरील वक्तव्यात पंतप्रधानानी केले डॉ. आंबेडकरांचे योगदान अधोरेखीत

भारतीय राज्य घटना “भारतीयांचा गौरव आणि अखंड भारत” याची खात्री देते असे उदृगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आणि संविधान दिनाचे औचित्य साधत लोकसभेमध्ये आयोजित केलेल्या या बैठकीत ते आज बोलत होते.

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात, राज्यघटनेच्या तरतूदी नागरिकांपर्यंत जागृतीपुर्वक पोहचवणे गरजेचे आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यामागे केंद्र सरकारची त्या दृष्टीने असलेली विचारधारा दिसून येते आणि आगामी काळात ही संकल्पना अजून दृढ होईल असे मोदींनी सांगितले.

राज्यघटना निर्माण केलेल्या व्यक्तींची स्तुती करायला शब्द अपुरे आहेत असे सांगतानाच डॉ. आंबेडकरांचे राज्य घटनेतील योगदान नाकारता येणार नाही असे मोदी म्हणाले. डॉ. आंबेडकरांचे विचार व शिकवण ही सर्व पिढयांसाठी ग्राहृय आणि लागु पडणारी आहे.

एकवाक्यता आणि करारामुळे लोकशाही दिवसेंदिवस बळकट होत आहे असे असताना बहुसंख्य आणि अल्पसंख्याक या संकल्पनाना नेहमी अखेरचे स्थान आहे.

नागरिकांनी आपले हक्क आणि जबाबदारीला समान महत्व द्यावे. भारताच्या कल्पनेचे वर्ण़न करताना “सत्यमेव जयते” आणि “सर्व पंथ संभव” या शब्दात पंतप्रधानांनी भारताच्या कल्पनेचे वर्णन केले.

S.Mhatre/B.Gokhale