Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीतील भारताच्या  8.2% च्या मजबूत जीडीपी वाढीचे पंतप्रधानांनी  केले स्वागत


 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज  जीडीपीच्या ताज्या  आकडेवारीचे स्वागत करताना नमूद केले की भारताच्या अर्थव्यवस्थेने 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत  8.2 ची प्रभावी वाढ नोंदवली आहे.  ही कामगिरी सरकारची विकासाभिमुख धोरणे आणि सुधारणा तसेच भारतातील लोकांचे कठोर परिश्रम आणि उद्यमशीलता  यांचा प्रभाव प्रतिबिंबित करते असे ते म्हणाले.   सरकार सुधारणांना गती देण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाचे जीवन सुखकर करण्यासाठी वचनबद्ध आहे, जेणेकरून विकासाचे फायदे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचतील यावर  मोदी यांनी  भर दिला .

एक्स वरील एका पोस्टमध्ये, मोदी म्हणाले:

“2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत 8.2% जीडीपी वाढ खूप उत्साहवर्धक आहे. ती आपली विकासाभिमुख धोरणे आणि सुधारणांचा प्रभाव प्रतिबिंबित करते. ती आपल्या लोकांचे कठोर परिश्रम आणि उद्यमशीलता देखील प्रतिबिंबित करते. आमचे सरकार सुधारणांना गती देत  राहील आणि प्रत्येक नागरिकासाठी जीवन सुखकर बनवत राहील.”

***

निलिमा चितळे/सुषमा काणे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai