Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वसुंधरा दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश


वसुंधरा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेश दिला आहे.

आपली पृथ्वी स्वच्छ आणि हरित ठेवण्याचा ठोस संकल्प करून आजच्या वसुंधरा दिनानिमित्त या भूमातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. या पृथ्वीतलावरील सर्व प्राणी, पशु-पक्षी यांच्यासह एकोप्यानं राहून भावी पिढ्यांसाठी निसर्गाच्या ऋणातून उतराई म्हणून आपण कार्य करण्याची गरज आहे.

यावर्षी ‘पर्यावरण आणि हवामान साक्षरता’ हा मुख्य मुद्दा घेऊन वसुंधरा दिन साजरा केला जात आहे. यामुळे नैसर्गिक साधन संपत्ती-स्रोत आणि निसर्गाचं संरक्षण याविषयी जनमनात जागृती निर्माण होईल, अशी मला आशा आहे, असे पंतप्रधानांनी या संदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor