Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वस्तू आणि सेवा कर (राज्यांना नुकसान भरपाई) अध्यादेश २०१७ आणण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने वस्तू आणि सेवा कर (राज्यांना नुकसान भरपाई) कायदा , २०१७ मध्ये योग्य सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याच्या अर्थ मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

या मंजुरीमुळे भरपाई उपकर १५ टक्क्यांवरून वाढवून २५ टक्के करायची अनुमती मिळेल.

1) चालकासह १३ व्यक्तींच्या वाहतुकीसाठी मोटार वाहन (उपशीर्षक ८७०२१०, ८७०२२०, ८७०२३० किंवा ८७०२९०)

2) शीर्षक ८७०३ अंतर्गत येणारी मोटार वाहने

वस्तू आणि सेवा कर परिषदेने ऑगस्ट २०१७ मध्ये झालेल्या बैठकीत ही वस्तुस्थिती लक्षात घेत कि जीएसटी लागू झाल्यानंतर एकूण मोटार वाहनावरील कर पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. त्यामुळे ८७०२ आणि ८७०३ अंतर्गत येणाऱ्या मोटार वाहनावर कमाल दर १५ वरून २५ टक्के वाढवण्याची शिफारस केली होती.

मोटार वाहनांवरील भरपाई उपकरातील प्रभावी दरातील वाढीचा आढावा जीएसटी परिषद आगामी काळात घेईल.

B.Gokhale/S.Kane/D.Rane