Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वाराणसी- पाटणा रेल्वे गाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा, विविध विकास कामांचं उद्‌घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वाराणसीमधील मांदुआदीह रेल्वे स्थानक आणि पाटणा दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला. तसेच त्यांनी विविध विकास कामांचा शुभारंभ केला आहे. वाराणसीतल्या डीएलडब्ल्यू मैदानावर जनसभेला संबोधितही केले.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांचे मन:पूर्वक स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी काशीच्या लोकांचे आभार मानले. डिझेल लोकोमोटीव्ह अर्थात डीएलडब्ल्यूचा निरंतर विकास आणि श्रेणीवाढ करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

गृहबांधणी क्षेत्रातील राज्य सरकारच्या प्रयत्नांबद्दल तसेच अधिक लोकांना गृहनिर्माण सुविधा मिळाव्या याकडे लक्ष पुरवल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले.

डीएलडब्ल्यू या ठिकाणी विविध टाकाऊ मालापासून संपत्ती निर्माण करणाऱ्या उपक्रमांचा आधारीत प्रदर्शनांचंही त्यांनी कौतुक केले.

वाराणसीत पर्यटनासाठी मोठे असून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत असे पंतप्रधान म्हणाले.

‘आयुषमान भारत’ ही नुकतीच सुरू झालेली योजना आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणार आहे. या योजनेमुळे गरीबांना सर्वोत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळतील असे पंतप्रधान म्हणाले. योजनांची अंमलबजावणी उत्तम रितीने केल्याबद्दल पंतप्रधानांची उत्तर प्रदेश सरकारची प्रशंसा केली.

B.Gokhale/J.Patankar/P.Kor