पीएम्इंडिया
पंतपधान नरेंद्र मोदी यांनी आज, वाराणसी विधानसभा मतदार संघात समावेश असलेल्या गावांच्या सरपंचाचे नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी स्वागत केले. पंतप्रधानांची भेट घेणारा हा दुसरा गट आहे.
चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी सरपंचानी आपल्या संबंधित गावांमध्ये प्रत्येक मुलीला शिक्षित आणि गाववासियांना स्वच्छतेप्रती जागृत करण्यासाठी प्रोत्साहित केले. मुलगा आणि मुलीमध्ये कोणताही भेदभाव न करण्याची त्यांनी विनंती केली. ते म्हणाले, स्वच्छता ही समृध्दीची किल्ली आहे.
पंतप्रधानांनी यावेळी तेथे उपस्थित प्रत्येक सरपंचाला विनंती केली की, तिने अथवा त्याने आपल्या कार्यकाळात एखाद्या विशिष्ट विकास उपक्रम सुरु करावा ज्याचा वारसा पुढे निरंतर सुरु राहिल.
BG/SM/AK
Today again, met a group of village Pradhans from Varanasi. We had a very invigorating & comprehensive interaction. https://t.co/2vt3tDxg94
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2016