Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘विकसित भारत 2047’ साठी शासन व्यवस्थेशी संबंधित शिकवण सांगणारा एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री  रेखा गुप्ता यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सार्वजनिक जीवनातील 25 वर्षे  वर्तमानातील गरजा पूर्ण करण्यासाठी ‘सेवा’ आणि भविष्यातील आकांक्षा साकार करण्याच्या ‘संकल्प’ प्रती त्यांच्या  कटिबद्धतेचे प्रतिबिंब आहे असे या लेखात अधोरेखित करण्यात आले आहे.

दिल्लीतील शासन-कारभारासाठी  महत्त्वाचा बोध सांगताना, त्या  विकसित दिल्लीच्या उभारणीच्या दृष्टीकोनावर भर देतात , जो तिथल्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करेल आणि ‘विकसित भारत 2047’ चे  राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यात योगदान देईल.

मोदी यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केले;

दिल्लीच्या मुख्यमंत्री @gupta_rekha लिहितात की, पंतप्रधान @narendramodi यांचा सार्वजनिक जीवनातील  25 वर्षांचा प्रवास हा आजच्या गरजांसाठी ‘सेवा’ आणि उद्याच्या आकांक्षांसाठी ‘संकल्प’ यांचा संगम आहे. 

कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यापासून ते शिक्षण, आरोग्यसेवा आणि कौशल्य विकास सुधारण्यापर्यंत , दिल्लीच्या प्रशासनासाठी अनेक गोष्टी शिकल्याचे त्या सांगतात .  ‘विकसित भारत 2047 ‘ चा एक महत्त्वाचा भाग म्हणून ‘विकसित दिल्ली’ घडवणे हे याचे उद्दिष्ट आहे.

***

राधिका अघोर/सुषमा काणे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]