Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि फ्रान्स दरम्यान संयुक्त समितीची स्थापना करण्याविषयी व्यवस्था


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत भारत आणि फ्रान्स दरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त समितीविषयी माहिती देण्यात आली. 25 जानेवारी 2016 रोजी नवी दिल्ली येथे अशी शिखर समिती स्थापन करण्याविषयीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

करारानुसार, ही संयुक्त समिती भारत आणि फ्रान्स यांच्यादरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी प्राथमिकता निश्चित करेल, ज्यामुळे संशोधन, विकास आणि नवकल्पना यांच्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक विकास साध्य करता येईल.

भारताचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री आणि फ्रान्सचे परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय विकास खात्याचे मंत्री या समितीचे संयुक्तरित्या अध्यक्षपद भूषवतील किंवा भारतीय शासकीय व्यवस्थेतील सचिव दर्जाचा अधिकारी आणि फ्रान्समधील महासंचालक दर्जाचा अधिकारी अध्यक्षपद भूषवतील.

दोन्ही देशांदरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढते सहकार्य तसेच राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक संस्था यांच्या प्रयत्नांमुळे हा करार पूर्णत्वास येत आहे.

S.Thakur/S.Tupe/M.Desai