पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्य क्षेत्रातील सहकार्यासाठी ब्रिक्स सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती दिली. मार्च 2015 मध्ये ब्राझीलमध्ये ब्रासिलिया येथे झालेल्या तिसऱ्या ब्रिक्स एसटीआय मंत्रीस्तरीय बैठकीनंतर भारताने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्य क्षेत्रातील सहकार्यासाठी ब्रिक्स सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या सामंजस्य करारामुळे ब्रिक्स देशांतर्गत विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्य क्षेत्रातील सहकार्य वृध्दिंगत होईल.
जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्य (एसटीआय) क्षेत्रातील सहकार्यासाठी धोरणात्मक आराखडा करणे, प्रादेशिक सामाजिक-आर्थिक समस्यांच्या निराकरणासाठी ब्रिक्स देशांदरम्यान एसटीआयमधील अनुभवाचे आदान प्रदान, नवीन ज्ञान आणि नाविन्य उत्पादन, सेवा व प्रक्रियेची निर्मिती ही या कराराची उद्दिष्टये आहेत.
S.Mhatre/S,Tupe/M.Desai