Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वित्त कायदा 2007 च्या 136 कलमांतर्गत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणावर लावण्यात आलेल्या उपकरातल्या शिलकीचा एकल स्थायी कॉर्पस निधी निर्माण करण्याला मंत्रिमंडळाची मंजूरी


माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी,सार्वजनिक खात्यामध्ये एकल स्थायी कॉर्पस निधी जो, “माध्यमिक आणि उच्च स्तर शिक्षण कोष” म्हणून ओळखला जाईल, या कोष निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.

शिक्षण विषयक या कोषात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण कराची शिल्लक जमा केली जाईल. या कोशातल्या निधीचा संपूर्ण देशातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांसाठी उपयोग केला जाईल.

मनुष्य बळ विकास मंत्रालय याची देखरेख आणि प्रशासन पाहील.सध्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण योजनांवर याचा वापर करता येईल,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणविषयक, भविष्यातल्या कार्यक्रम अथवा योजनेसाठीही मनुष्यबळ विकास मंत्रालय यातल्या निधीचा उपयोग करू शकेल.

N.Sapre/N.Chitale/Anagha