Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विदेशी भारतीयांचे “भारत विकास फौंडेशन” बंद करण्यासाठी मंत्रीमंडळाची मान्यता


विदेशी भारतीयांचे “भारत विकास फौंडेशन” बंद करण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. स्वच्छ भारत अभियान आणि गंगा स्वच्छता अभियानासारख्या राष्ट्रीय अभियानात विदेशस्थ भारतीयांच्या योगदान समन्वय वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पूर्व पीठिका

आय डी एफ –ओ आय ची, स्वायत्त, अ-लाभकारी ट्रस्ट म्हणून 2008 मध्ये केंद्रीय मंत्री मंडळाच्या मंजुरीने निर्मिती करण्यात आली होती.भारतातल्या सामाजिक आणि विकास प्रकल्पात परदेशस्थ भारतीयांचे योगदान सुकर करण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली.

डिसेंबर 2008 ते मार्च 2015 मध्ये फौंडेशनला परदेशी भारतीयाकडून केवळ 36.80 लाख देणगी मिळाली त्यानंतर 2015 मध्ये त्याचा आढावा घेण्यात आला.स्वच्छ गंगा,स्वच्छ भारत अभियान यासारखी राष्ट्रीय अभियाने आणि राज्य सरकारांचे सामाजिक आणि विकास प्रकल्प यांचा आय डी एफ –ओ आय च्या आदेश पत्रात समावेश करण्यात आला.

एप्रिल 2015 ते मार्च 2018 या काळात ट्रस्टला 10.16 कोटी देणगी मिळाली तरी ती प्रामुख्याने स्वच्छ गंगा आणि स्वच्छ भारत अभियानासाठी होती, या अभियानाचे संबंधीत प्रशासकीय एजन्सी कडून स्वतंत्रपणे व्यवस्थापन करण्यात येत होते. समन्वय,परिणामकारकता वाढवण्यासाठी आणि कामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत 31 मार्च 2018 पासून ट्रस्ट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

******

BG/ NC