Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विद्युत निर्मितीचा खर्च कमी करण्यासाठी घरगुती कोळसा वापरासंबंधी धोरणात लवचिकता आणण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी


वीज निर्मितीचा खर्च कमी करण्यासाठी घरगुती कोळसा वापर करण्यासंबंधीच्या धोरणात लवचिकता आणण्यात येणार आहे. याविषयीच्या निर्णयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली

.
विद्युत निर्मितीचा खर्च कमी व्हावा, तसेच राज्य वितरण कंपन्यांनाही कमी दरात वीजेची खरेदी करणे शक्य व्हावे, यासाठी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. कोळसा वापरण्याच्या लवचिक धोरणामुळे विद्युत निर्मिती खर्च कमी होऊन आणि वीज निर्मिती साहित्यांची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

या नवीन धोरणामुळे देशाच्या नैसर्गिक साधनसामुग्रीचा जास्तीत जास्त वापर करुन आर्थिक दृष्टया बचत होणार आहे. त्याचबरोबर कोळशाच्या वाहतुकीवर होणारा प्रचंड खर्च कमी होणार आहे. या बचत होणाऱ्या ऊर्जेचा वापर दुसरीकडे करणे शक्य होणार आहे. तसेच रेल्वे वाहतुकीवरील ताण घटणार आहे. कोळशाचा वापर कमी झाल्यास पर्यावरणाचे नुकसान कमी होणार आहे.

हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या “उदय” योजनेनुसार बनवण्यात आला असून अकार्यक्षम वीज उत्पादक संयंत्रााऐवजी कोळसा खाणींच्या जवळ संयंत्र असणे लाभदायक ठरणार आहे. यामुळे कोळसा वाहून नेण्याच्या खर्चात मोठया प्रमाणावर कपात होणार आहे.

S.Bedekar/B.Gokhale