पीएम्इंडिया
विपुल लेखक, विचारवंत आणि लोक तत्वज्ञ बलबीर पुंज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
बलबीर पुंज जी हे एक विपुल लेखक, विचारवंत आणि लोक तत्वज्ञ होते, त्यांनी माध्यम जगताला समृद्ध करणारे मोठे योगदान दिले असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांचे लेखन मोठ्या प्रमाणावर वाचले जात असे आणि त्यातून देशाच्या पुनरुत्थानाप्रती असलेली त्यांची प्रबळ ओढ दिसून येत असे, असेही त्यांनी म्हटले आहे. पुंज यांनी संसदेत केलेली भाषणे ही तथ्य आणि सिद्धांतांनी समृद्ध असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश,
“श्री बलबीर पुंज जी हे एक सर्जनशील लेखक, विचारवंत आणि लोक तत्वज्ञ होते. त्यांनी माध्यम जगताला समृद्ध करणारे मोठे योगदान दिले त्यांचे लेखन मोठ्या प्रमाणावर वाचले गेले असून, देशाच्या पुनरुत्थानाप्रती असलेली त्यांची प्रबळ ओढ दिसून येते. संसदेतील त्यांची भाषणे ही तथ्य आणि सिद्धांतांनी समृद्ध होती.
श्री बलबीर पुंज जी यांनी विशेषतः विद्यार्थी, उद्योजक-व्यावसायिक, अभ्यासक आणि बुद्धीवंतांच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांनी गुजरातसह विविध राज्यांचे प्रभारी म्हणून काम पाहिले होते. त्या काळातील आमच्यातील संवाद आणि भेटीगाठी मला ठळकपणे आठवतात. त्यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रांच्या प्रती माझ्या शोकसंवेदना, ओम शांती.”
Shri Balbir Punj Ji was a prolific writer, thinker and public intellectual. He made a rich contribution to the world of media. His writings were widely read, reflecting his strong passion towards national regeneration. His Parliamentary interventions were rich in facts and… pic.twitter.com/ZVsZ9Np8Iv
— Narendra Modi (@narendramodi) April 18, 2026
बलबीर पुंज जी एक प्रसिद्ध लेखक होने के साथ-साथ प्रखर विचारक और सम्मानित बुद्धिजीवी थे। मीडिया के क्षेत्र में उनका योगदान बहुत सराहनीय रहा है। लोग उनकी लेखनी के कायल थे, जिससे राष्ट्र निर्माण के प्रति उनकी गहरी प्रतिबद्धता परिलक्षित होती थी । उनके संसदीय भाषणों में तथ्यों और… pic.twitter.com/SOirA8gDJe
— Narendra Modi (@narendramodi) April 18, 2026
***
यश राणे/ तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]