Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विवादांची जागा संवाद कसा घेत आहे आणि विश्वासामुळे केंद्र-राज्य यांच्यातील संबंध कसे दृढ होत आहेत, हे अधोरेखित करणारा एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक.


नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसामचे मुख्यमंत्री  हिमंता बिस्वा सरमा यांचा एक लेख सामायिक केला आहे. या लेखात, विवादांची जागा संवाद कसा घेत आहे, विश्वासामुळे केंद्र-राज्य संबंध कसे दृढ होत आहेत आणि विकासामुळे प्रगतीचे नवीन मार्ग कसे खुले होत आहेत, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. गेल्या दशकात  देशातील विविध सहकारी राज्यांमधील विवादांमध्ये झालेला बदल, तसेच आपण विश्वासाने किती प्रगती केली आहे आणि काय साध्य केले आहे, याचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे.

आपल्या एक्सवर पंतप्रधानांनी पोस्ट केले आहे:

“विवादांची जागा आता संवादाने घेतली आहे, परस्पर विश्वासाने केंद्र-राज्य यांच्यातील संबंध दृढ होत आहेत आणि विकासामुळे प्रगतीचे नवे मार्ग खुले होत आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी आपल्या अलीकडील लेखात गेल्या दशकात साकारलेल्या ‘सहकारी संघराज्यवाद’ (cooperative federalism) मधील बदलांचा आढावा घेतला आहे. आपण आतापर्यंतचा प्रवास कसा पूर्ण केला आणि विश्वासाच्या जोरावर काय साध्य केले, याचा वेध घेणारा हा एक चिंतनशील लेख आहे!”

राधिका अघोर/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai