Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विविध सणांनिमित्त देशातल्या जनतेला पंतप्रधानांच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या विविध सणांनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

बैसाखीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणणारा ठरो. देशाला अन्नधान्य पुरविण्यासाठी अहोरात्र काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता.

भारताला लाभलेल्या विविधतेचा आम्हाला अभिमान आहे. देशभरातील जनता विविध सण साजरे करत आहे. या विशेष प्रसंगी प्रत्येकाला शुभेच्छा.

पुथांडूनिमित्त तमिळ जनतेला शुभेच्छा. येत्या वर्षात आपणा सर्वांच्या आशा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी आपली प्रार्थना असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

विशूनिमित्त शुभेच्छा. नवे वर्ष, नव्या आशा, अधिक भरभराट आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.

बंगाली जनतेला पोईला बैशाखनिमित्त शुभेच्छा. नवे वर्ष सर्वांच्या जीवनात शांतता, आनंद आणि भरभराट आणणारे ठरो. शुभोनबो बर्षो.

बोहागबिहू निमित्त आसामी बंधु-भगिनींना शुभेच्छा. हा उल्हासपूर्ण सण समाजासाठी उत्तम आरोग्यदायी आणि आनंददायी ठरो. जगभरातल्या माझ्या ओडिया मित्रांसाठी, महा विषुभ सक्रांतीच्या शुभेच्छा. आगामी वर्ष प्रगतीचे राहो. ओडियाच्या समृद्ध संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे, असे पंतप्रधानांनी ट्विटरसंदेशात म्हटले आहे.

BG/NC/PK