Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन 2016 ला पंतप्रधान उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन 2016 ला उपस्थित राहिले.

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडलेल्‍या ताफा संचलन आणि फ्लायपास्टमध्ये जगभरातील नौदल एकत्र आले तसेच भारतीय नौदलाचे सामर्थ्य प्रमुख वैशिष्टय होते.

पंतप्रधानांनी सागरी प्रदर्शनाला भेट दिली, यामध्ये भारतीय नौदलाच्या स्वदेशी तंत्रज्ञान क्षमतेचे दर्शन घडवण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या ठिकाणी त्यांनी कलाकुसर प्रदर्शनालाही भेट दिली. ज्यामध्ये भारतातील कारागिरांनी त्यांच्या वस्तू मांडल्या होत्या.
भारतीय नौदलाच्या वाद्यवृंदाने सादर केलेल्या “प्रेसिडेन्शिअल बॅन्ड कॉन्सर्ट” या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहिले.

पंतप्रधान उद्या विशाखापट्टणम् येथे आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाचा एक भाग असलेल्या नौदल प्रात्यक्षिकांना उपस्थित राहतील आणि संबोधित देखील करतील.

S.Kane/S.Tupe/M.Desai