पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की सरकारचा गेल्या 12 वर्षांचा कार्यकाळ विश्वास, विकास आणि जनकल्याणाप्रती समर्पित राहिला आहे. 140 कोटी भारतीयांचे आशीर्वाद आणि ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना यांच्या मदतीने तरुण वर्ग, महिला तसेच शेतकरी बंधू-भगिनींना सक्षम करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली गेली नाही असे त्यांनी नमूद केले.
पायाभूत सुविधांपासून डिजिटल क्रांतीपर्यंत प्रत्येक बाबतीत आज देशाने जगभरात नवी ओळख निर्माण केली आहे हे अथक प्रयत्नांचेच फळ आहे असे निरीक्षण मोदी यांनी नोंदवले. विकसित भारत उभारण्याचा निर्धार पूर्ण करण्यासाठी सरकार सेवा, उत्तम प्रशासन आणि समृद्धीच्या याच मार्गावरून पुढे जात राहिल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.
‘एक्स’वर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“आपल्या सरकारच्या कार्यकाळाची गेली 12 वर्षे विश्वास, विकास तसेच जनकल्याणाप्रती समर्पित राहिली आहेत. 140 कोटी देशवासीयांचे आशीर्वाद आणि ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेसह आम्ही युवा वर्ग, महिला तसेच शेतकरी बंधू-भगिनींना सक्षम करण्यात कोणतीही कसूर केली नाही. पायाभूत सुविधांपासून डिजिटल क्रांतीपर्यंत प्रत्येक बाबतीत आज देशाला जगभरात नवी ओळख मिळाली आहे हे आमच्या अथक प्रयत्नांचेच फळ आहे. विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याचा निर्धार पूर्ण करण्यासाठी आम्ही सेवा, उत्तम प्रशासन आणि समृद्धीच्या याच मार्गावरून सतत पुढे जात राहू.
#12YearsOfSeva”
हमारी सरकार के बीते 12 वर्ष विश्वास, विकास और जनकल्याण को समर्पित रहे हैं। 140 करोड़ देशवासियों के आशीर्वाद और राष्ट्र प्रथम की भावना से हमने युवाओं, महिलाओं और अपने किसान भाई-बहनों को सशक्त बनाने में कोई कोर-कसर नहीं छोड़ी है। यह हमारे अथक प्रयासों का ही परिणाम है कि… pic.twitter.com/URtsOWF4BT
— Narendra Modi (@narendramodi) June 9, 2026
***
NitinFulluke / SanjanaChitnis / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com