Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

व्यवसाय स्नेही क्रमवारीत भारताची झेप पंतप्रधानांकडून अभिनंदन

व्यवसाय स्नेही क्रमवारीत भारताची झेप पंतप्रधानांकडून अभिनंदन

व्यवसाय स्नेही क्रमवारीत भारताची झेप पंतप्रधानांकडून अभिनंदन


जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभीकरण अहवालातल्या क्रमवारीत भारताने 30 स्थानांची झेप घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. बँकेच्या आज जाहीर झालेल्या अहवालात भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. भारताने 130 व्या स्थानावरुन 100 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

क्रमवारीत झालेली सुधारणा ऐतिहासिक असल्याचे पंतप्रधानांनी ट्विटर मालिकेत म्हटले आहे. “टीम इंडिया”च्या सर्वंकष आणि बहु-विभागीय सुधारणांचा हा परिणाम असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

व्यवसाय सुलभीकरण वातावरणामुळे आपल्या लघु आणि मध्यम उद्योगांसाठी ऐतिहासिक संधी उपलब्ध आहेत असून, अधिक भरभराट होत आहे.

गेल्या तीन वर्षात राज्यांमध्ये व्यवसाय सुलभीकरणाच्या क्षेत्रात सकारात्मक चढाओढ दिसून येत आहे आणि हे फायदेशीरच आहे.

भारतात व्यवसाय करणे आजच्या इतके याआधी सुलभ कधीही नव्हते. भारतात असलेल्‍या आर्थिक संधी पडताळून पाहण्यासाठी भारत जगाचे स्वागत करत आहे.

“सुधारणा कामगिरी आणि परिवर्तन” या मंत्रानुसार कार्य करत आमच्या क्रमवारीत अधिक सुधारणा व्हावी यासाठी आम्ही कटिबध्द आहोत आणि आम्ही अधिक उच्च आर्थिक विकास साध्य करु, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

******

B.Gokhale/J.Patanakar/Anagha