Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

व्याघ्र संरक्षणाबाबत तिसऱ्या आशिया मंत्रीस्तरीय संमेलनात पंतप्रधानांचे भाषण

व्याघ्र संरक्षणाबाबत तिसऱ्या आशिया मंत्रीस्तरीय संमेलनात पंतप्रधानांचे भाषण


भूतानच्या शाही सरकारचे कृषी आणि वन मंत्री आणि जागतिक व्याघ्र परिषदेचे अध्यक्ष,
व्याघ्र शृखंला देशातील सन्माननीय मंत्री महोदय, आमचे पर्यावरण आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर,

व्यासपीठावर उपस्थित अन्य मान्यवर पाहुणे, व्याघ्र शृंखला देशांचे प्रतिनिधी,

बंधु आणि भगिनींनो,

मला आपल्या सर्वांचे स्वागत करताना खूप प्रसन्न वाटत आहे. वाघांनी आपल्या सर्वांना एकत्र आणले आहे. ही बैठक विनाश होत असलेल्या किंवा लोप पावत चाललेल्या जातींच्या संरक्षणाबाबत विचार करण्यासाठी महत्वपूर्ण आहे. आपली उपस्थिती, या जातींच्या या छत्रछायेला आपला देश किती महत्व देत आहे, याची साक्ष आहे.

निसर्गाचे पिरॅमिड आणि आहार शृंखलेत वाघ हा सर्वात मोठा ग्राहक आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. वाघांसाठी मोठ्या प्रमाणात आहार आणि चांगल्या जंगलांची आवश्यकता असते. अशा रितीने वाघांचे संरक्षण करुन आपण संपूर्ण निसर्गाची प्रणाली आणि निसर्गाचे रक्षण करत असतो. मानव जातीच्या कल्याणासाठीही हे तेवढेच महत्वपूर्ण आहे.

वास्तविक व्याघ्र संरक्षणाचे अनेक फायदे आहेत, परंतु त्याचा पूर्ण फायदा करुन घेतला जात नाही. आपण आर्थिक संदर्भात याचे प्रमाण निश्चित करु शकत नाही. निसर्गाचे मूल्य लावणे खूप कठीण आहे. निसर्गाची तुलना धनाशी केली जात नाही, कारण निसर्गाने वन्य प्राण्यांना आत्म संरक्षणाची शक्ती दिली आहे. त्यामुळेच निसर्गाचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. भारतात वाघाचं महत्व अन्य वन्य प्राण्यांपेक्षाही खूप अधिक आहे. आपल्या पुराणात निसर्ग मातेचे प्रतिक असलेल्या दुर्गा मातेला वाघावर स्वार झालेले दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात आपले बहुतेक देव आणि देवी या कोणत्या ना कोणत्या प्राणी, वृक्ष किंवा नदीशी जोडले गेलेले आहेत. कधी-कधी तर या प्राण्यांना देवी देवतांच्या बरोबरीने ठेवण्यात येते/दर्शवण्यात येते. वाघ आपला राष्ट्रीय प्राणी आहे. व्याघ्र शृंखला देशांमध्येही वाघाशी जोडल्या गेलेल्या अनेक सांस्कृतिक कथा आणि वारसा असेल याची मला खात्री आहे.

मित्रांनो,

प्राणी साम्राज्याशी जोडल्या गेलेल्या जाती या सामान्यत: आपल्या वाईटासाठी कार्य करत नाहीत. परंतु मात्र मानव जात याला अपवाद आहे. आमच्या इच्छा, आमच्या आवश्यकता आणि लालसेच्या कारणामुळे निसर्गाचा ऱ्हास झाला आहे आणि नैसर्गिक प्रणालीचे नुकसान झालं आहे. इथे तुम्हा सर्वांना मी भगवान बुध्दांच्या शब्दांचे स्मरण करु देऊ इच्छितो. त्यांनी म्हटलं होतं की, “निसर्ग ही अपरांपर कृपा आहे, तो सर्व प्राण्यांना सुरक्षा देतो आणि कुऱ्हाड चालवणाऱ्यांनाही आपली सावली देतो”.

व्याघ्र शृखंलेतील देश वाघ संरक्षणाच्या कार्यात करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. या प्रयत्नांसाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. जागतिक व्याघ्र कार्यक्रम आणि परिषदेद्वारे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचेही मी कौतुक करतो.

2010 मध्ये व्याघ्र संमेलनाचं आयोजन करण्यात ब्लादीमीर पुतिन यांनी केलेल्या प्रयत्नांचा मी उल्लेख करु इच्छितो. त्यांच्या प्रयत्नांमुळेच जागतिक व्याघ्र पुन:प्राप्ती कार्यक्रमाचा रुप परिणाम दिसून आला. परंतु मला जे सांगण्यात आलंय त्यावरुन असे वाटते आहे की, व्याघ्र शृंखला देशांमध्ये वाघांच्या निवासाचे क्षेत्र कमी होते आहे. वाघांच्या शरीराच्या भागांच्या तस्करीमुळेही परिस्थिती गंभीर झाली आहे. भारतातही आम्ही अवैध शिकाराची समस्या आणि वाघांच्या नैसर्गिक प्रणालीत येत असलेल्या त्रुटींच्या आव्हानांशी सामना देत आहोत.

पण आमच्या बाजूनेही एक चांगली गोष्ट आहे की, आमची बहुसंख्य लोकसंख्या झाडे, प्राणी, वने तसेच सूर्य आणि चंद्रासारख्या प्राकृतिक तत्वांचा आदर करते. आम्ही पृथ्वीला मातेच्या रुपात मानतो/ पाहतो. आमचे धर्मग्रंथ संपूर्ण ब्रम्हांडाला एकच मानण्याची शिकवण देतात. “वसुधैव कुटुंबकम्” आणि “लोक: समस्ता: सुखिनो भवन्तु” ही आमची शिकवण आहे. आम्ही शांतता आणि पर्यावरण प्रणाली सहित सर्वांच्या समृध्दीसाठी प्रार्थना करतो. ओम औ:, शांति, रंतरिक्ष शांति, पृथवी शांति:, रुप: शांति:, रोषधय: शांति:, वनस्पतय: शांति!

मित्रांनो,

जंगलांना वन्य जीवांपासून वेगळे करता येत नाही. दोन्ही स्वाभाविकपणे परस्पर पूरक आहेत. एकाला नष्ट करणे म्हणजेच दुसऱ्याला नष्ट करणे आहे. हवामान बदलाचे हे एक महत्वपूर्ण कारण आहे, जो आपल्यावर अनेक प्रकारे विपरीत परिणाम करत आहे. ही जागतिक समस्या आहे आणि आम्ही त्याच्याशी लढा देत आहेत. आम्ही या विपरीत परिणामांमध्ये घट व्हावी या उपायांसाठी विशेष रणनितीच्या दिशेने काम करण्याचा संकल्प केला आहे.

माझ्या विचारानुसार व्याघ्र शृंखला देशांसाठी विकाससक्षम वाघांची संख्या ही निश्चितपणे हवामान बदलाचे शमन व्हावे या रणनितीचे प्रतिक आहे. यामध्ये वाघ बहुल जंगलांच्या क्षेत्रात वाढ होण्यामुळे कार्बन वायू शोषला जाईल. अशा रितीने व्याघ्र संरक्षणासोबत आपण आपले आणि आपल्या भावी पिढ्यांचे ऊज्वल भविष्य सुनिश्चित करु.

भारतात व्याघ्र संरक्षणाचा यशस्वी ट्रॅक रेकॉर्ड आहे. आम्ही 1993 मध्ये व्याघ्र मोहिम सुरु केली. या मोहिमेची व्याप्ती 9 व्याघ्र अभयारण्यांपासून वाढून 49 व्याघ्र अभयारण्यांपर्यंत पोहोचली आहे. वाघांचे संरक्षण ही भारत सरकार आणि राज्यांची सामुदायिक जिम्मेदारी आहे. मी या दिशेने आमच्या राज्य सरकारांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करतोही, पण सरकारचे प्रयत्न तोपर्यंत यशस्वी होणार नाहीत, जोपर्यंत त्यांना जनतेचे समर्थन मिळणार नाही. आमचा सांस्कृतिक वारसा करुणा आणि सह-अस्तित्वाला प्रोत्साहन देतो आणि त्‍याने व्याघ्र प्रकल्पाच्या यशस्वीतेत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अशाच सामुदायिक प्रयत्नांमुळे वाघांच्या संख्येत 30 टक्के वाढ झाली आहे. ही संख्या जी 2010 मध्ये 1 हजार 706 होती ती वाढून 2014 मध्ये 2 हजार 226 झाली आहे.

आमच्या राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाने अनेक ऐतिहासिक पावले उचलली आहेत. या संवेदनशील वन क्षेत्रांमध्ये बेकायदेशीर शिकारीविरुध्द लक्ष ठेवायला प्रोत्साहन देण्यासाठी 24 तास कार्य करणारे इन्फ्रारेड आणि थर्मल कॅमेरे लावण्याबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे. “स्मार्ट” गस्त तसेच वाघांवर नजर ठेवण्यासाठी अनेक नवे मार्ग विकसित करण्यात आले आहेत. वाघांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांतील छायाचित्रांचा एकत्रित डेटा बेस तयार करण्यात येत आहे. हे सर्व काम करण्यासाठी आम्ही या वर्षी व्याघ्र संरक्षणासाठीचा निधी दुप्पट केला आहे. व्याघ्र संरक्षणासाठीच्या निधीची तरतूद 150 कोटी रुपयांवरुन वाढवून 380 कोटी रुपये केली आहे. हे 3.8 अब्ज रुपये होतात.

माझा दृढ विश्वास आहे की, व्याघ्र संरक्षण आणि निसर्ग संरक्षण हे विकासाच्या मार्गातील अडथळे नाहीत. दोन्ही परस्पर पूरकपणे एकत्र मार्गक्रमण करतात. त्यामुळे आपण व्याघ्र संरक्षण हेच एकमेव लक्ष्य नसलेली क्षेत्रे लक्षात घेऊन, आपल्या रणनितीला नवे रुप देणे आवश्यक आहे. हे कठीण काम आहे, पण नक्कीच करता येईल. आपल्या प्रतिभेचा वापर जंगल पातळीवर वेगवेगळ्या संरचनेत वाघ आणि वन्य जीवन सुरक्षेला स्मार्ट पणे एकत्रित करण्यासाठी करायला हवा. यामुळे आपण बहु प्रतिक्षित स्मार्ट हरित संरचनेच्या दिशेने वाटचाल करतो आणि भू भागाचा दृष्टीकोन स्विकारतो. यामध्ये आम्हाला कार्पोरेट सामाजिक उत्तर दायित्वाद्वारे व्यावसायिक समूहांना व्याघ्र संरक्षणाच्या दिशेने सुरु असलेल्या कार्यक्रमांमध्ये सामील करुन घेण्यात मदत मिळेल. आम्ही भारतीय संदर्भानुसार हे सारे वन संरक्षण योजनांच्याद्वारे मिळवू इच्छितो.

व्याघ्र संरक्षण क्षेत्रांच्या परिस्थिती जन्य प्रणालींचा विचार करताना, आपल्याला ती क्षेत्र म्हणजे नैसर्गिक पूंजी अथवा ठेवा आहेत असे मानावे लागेल. आमच्या संस्थांकडून काही वाघ अभयारण्य क्षेत्रांचे विकास मूल्यांकन केले गेले. या अभ्यासातून एक तथ्य समोर आले आहे, की वाघांना संरक्षण प्रदान करण्यासोबतच अतिरिक्त संरक्षित क्षेत्रे ही अनेक आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक लाभ प्रदान करतात. या लाभांना पर्यावरण प्रणाली सेवांच्या रुपात ओळखले जाते. त्यामुळेच संरक्षणाला विकासातील अडथळा मानण्याऐवजी विकासाचे एक साधन या रुपात परिभाषित केले जाण्याची गरज आहे. यासाठी विकास आणि वृध्दीच्या आर्थिक गणिताअंतर्गत पर्यावरण प्रणालीच्या मूल्यांना ध्यानात ठेवले पाहिजे.

मित्रांनो, मला विश्वास आहे की, आपण संरक्षणासाठी उद्योग क्षेत्राच्या सक्रीय भागीदारी साठी रुपरेषा बनवू शकतो. नैसर्गिक पर्यावरण प्रणाली ठेव्याचा संकेत देणाऱ्या भांडवलाला इतर भांडवली उत्पादनाच्या बरोबरीने आणायला हवे. आपण आपल्या अर्थव्यवस्थेला नैसर्गिक साधने आणि पर्यावरण प्रणाली सेवा असलेल्या मोठ्या अर्थव्यवस्थेच्या रुपात पाहण्याची गरज आहे.

एका देशाच्या रुपात/ एक देश म्हणून जगातील वाघांच्या संख्येपैकी 70 टक्के वाघ आपल्याकडे आहे. भारत इतर व्याघ्र शृखंला देशांसाठी पूरक बनण्यासाठी कटीबध्द आहे. चीन, नेपाळ, भूतान आणि बांगलादेश यांच्यासोबत आमची द्विपक्षीय व्यवस्था आहे. वाघ हा आपल्यासाठी पारंपरिक चिंतेचा विषय आहे आणि आम्ही त्याची ऊकल शोधण्याचा प्रयत्न सुरु ठेवत आहोत.

वाघाच्या शरीराच्या भागांना असणारी मागणी आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या उत्पादनांना असणारी मागणी हा वाघांसाठी एक खूप मोठा धोका आहे. जंगले आणि त्यातले वन्य प्राणी क्षेत्र हा एक मुक्त खजिना आहे आणि तो कोणतीही बंद करुच शकत नाही. वाघांच्या शरीराच्या भागांच्या बेकायदेशीर तस्करी बद्दल जाणून घेतल्यावर दु:ख होते. ही गंभीर समस्या निपटून काढण्यासाठी आपल्याला सरकारच्या सर्वोच्च स्तरावर कार्य करावे लागेल.

भारत इतर व्याघ्र शृखंला देशांप्रमाणेच जागतिक व्याघ्र संघटनेचा संस्थापक सदस्य आहे, संघटनेचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. ही अशा प्रकारची एकमेव आंतर-सरकारी संघटना आहे. ही संघटना जागतिक व्याघ्र कार्यक्रम परिषदेसोबत एकत्रितपणे कार्य करत आहे. यजमान देश म्हणून मी तुम्हाला संपूर्ण समर्थन देण्याचे आश्वासन देतो. आम्हाला भारतातील वन्य प्राणी संस्थांमध्ये वन्य जीव कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकासात मदत देण्यासाठीही आनंद होत आहे.

व्याघ्र शृंखला देशांमध्ये लुप्त होणाऱ्या जातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी इतर आंतरराष्ट्रीय करारांवरही स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. या संदर्भात मी तुम्हाला एक चांगली बातमी देवू इच्छितो. आम्ही औपचारिक रुपात दक्षिण आशिया वन्यप्राणी प्रवर्तन जाळे कायद्याचा स्विकार करण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करत आहोत.

सर्वात शेवटी मी हे सांगू इच्छितो की वाघांचे संरक्षण हे काही कोणत्याही निवडीचे अथवा पसंतीचे काम नाही, ही आवश्यकता आहे. मी हे देखील सांगू इच्छितो की वन्य प्राणी गुन्ह्यांचा मुकाबला करण्‍यासाठी विभागीय सहकार्य आवश्यक आहे. या संमेलनात वाघ आणि त्याच्या राहण्याच्या क्षेत्राच्या संरक्षणासाठी एकत्रित काम करण्याचा संकल्प केला पाहिजे. यासाठी भारत व्याघ्र शृखंलेतील सर्व देशांसोबत कार्य करण्यासाठी संकल्पबध्द आहे.

मी आपण उपस्थित राहिल्याबद्दल प्रशंसा करतो आणि हे संमेलन यशस्वी होवो अशी इच्छा व्यक्त करतो. आपणा सर्वांचे धन्यवाद.

J.Patnkar / S.Tupe / M. Desai