Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

व्हेनेझुएलाच्या काळजीवाहू राष्ट्राध्यक्षांनी घेतली पंतप्रधानांची भेट

व्हेनेझुएलाच्या काळजीवाहू राष्ट्राध्यक्षांनी घेतली पंतप्रधानांची भेट


नवी दिल्‍ली, 4 जून 2026

 

व्हेनेझुएलाच्या काळजीवाहू राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

या भेटीबद्दल आनंद व्यक्त करत पंतप्रधानांनी सांगितले की, ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजे, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य आणि लोकांमधील परस्पर संबंध या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.

व्हेनेझुएला हा लॅटिन अमेरिकेतला एक महत्त्वाचा भागीदार असल्याचे नमूद करत, या देशासोबतचे घनिष्ठ सहकार्य ग्लोबल साउथसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. उभय देशांच्या जनतेच्या परस्पर हितासाठी दोन्ही देश यापुढेही एकत्र काम करत राहतील, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:

“व्हेनेझुएलाच्या काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची भेट घेऊन आनंद झाला. ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजे, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य आणि लोकांमधील परस्पर संबंध या क्षेत्रांमधील आमचे सहकार्य विस्तारण्यावर आमच्यात सविस्तर चर्चा झाली.

लॅटिन अमेरिकेतला एक महत्वपूर्ण भागीदार या नात्याने, व्हेनेझुएलासोबतचे आमचे घनिष्ठ सहकार्य ग्लोबल साउथसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या देशांच्या जनतेच्या परस्पर हितासाठी आम्ही एकत्र काम करत राहू. @delcyrodriguezv”

 

* * *

सुषमा काणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai