Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली इराणच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली इराणच्या राष्ट्राध्यक्षांची भेट


नवी दिल्‍ली, 31 ऑगस्‍ट 2026

 

आज बिश्केक येथे आयोजित शांघाय शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्लामिक प्रजासत्ताक इराणचे राष्ट्राध्यक्ष महामहिम डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली.

दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. पश्चिम आशियातील संघर्षाच्या संदर्भातील अलीकडील घडामोडींवर त्यांनी चर्चा केली आणि बदलत्या परिस्थितीवर आपले विचार मांडले. या क्षेत्रातील वाढत्या तणावाबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली आणि सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच सोडवल्या गेल्या पाहिजेत या भारताच्या सातत्याने असणाऱ्या आग्रही भूमिकेचा पुनरुच्चार केला.

या प्रदेशात दीर्घकालीन शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याच्या गरजेचाही पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. नौवहन  आणि व्यापाराच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे आवाहन करतानाच, कोणत्याही परिस्थितीत व्यापारी  जहाजे  आणि खलाशांसह नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना कोणत्याही परिस्थितीत इजा पोहोचता कामा नये यावर भर दिला.

ब्रिक्स (BRICS)आणि शांघाय सहकार्य संघटनेसह (SCO) बहुपक्षीय संघटनांमध्ये इराणशी घनिष्ट सहकार्य करण्यासाठी भारत तत्पर असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी अध्यक्ष पेझेश्कियान यांचे भारतात स्वागत करण्यास आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

 

* * *

सुषमा काणे/सविता म्‍हस्‍कर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai