Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शांततापूर्वक आणि शिस्तबद्ध रितीने नोटा बदलून घेत असल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद


पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर नागरीक शांततापूर्वक आणि शिस्तबद्ध रितीने नोटा बदलून घेत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. अधिक भल्यासाठी नागरीक ज्या सहनशीलतेने आणि उत्साहाने हा मर्यादित त्रास सहन करत आहोत, ते पाहणे आनंददायी असल्याचे पंतप्रधानांनी ट्विटरच्या मालिकेत म्हटले आहे. भ्रष्टाचारमुक्त भारताच्या निर्मितीसाठी सरकारचे प्रयत्न निर्धारपूर्वक सुरु असल्याचा निर्वाळा पंतप्रधानांनी दिला असून, विकासाची फळे सर्व नागरीकांपर्यंत पोहोचतील याची खात्री दिली आहे.

नागरीक बँकर्सप्रती आभार व्यक्त करत आहेत आणि शांततापूर्वक आणि शिस्तबद्ध रितीने नोटा बदलून घेत आहेत हे समजल्यावर आनंद होत आहे.

बँकमधून पैसे काढण्यासाठी तसेच नोटा बदलून घेण्याच्या कामात लोक ज्येष्ठ नागरीकांना आपणहून मदत करत आहेत हे ऐकूनही खूप आनंद झाला आहे.

अधिक भल्यासाठी ज्या सहनशीलतेने अणि उत्साहाने लोक मर्यादित काळासाठी होणारा त्रास सहन करत आहेत, तेही खूप दिलासादायक आहे.

भ्रष्टाचार मुक्त भारताच्या निर्मितीसाठी आणि विकासाची फळे प्रत्येक नागरीकापर्यंत पोहोचावी यासाठी सरकारचे प्रयत्न निर्धारपूर्वक सुरुच आहेत असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

M.Desai/S.Tupe/J.Patankar/P.Malandkar