Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शासन व विकासाकामात अंतराळ तंत्रज्ञान वाढीला प्रोत्साहन देण्याविषयीच्या विशेष सत्रात पंतप्रधानांचे संबोधन

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे आज पार पडलेल्या शासन व विकासकामात अंतराळ तंत्रज्ञान वाढीला प्रोत्साहन देण्याविषयीच्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांसमोर दोन तास विविध विषयांवर सादरीकरण करण्यात आले. या सत्राला पंतप्रधानांनी संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी शासनाच्या सर्व विभागांमध्ये नवी अंतराळ तंत्रज्ञान प्रणाली वापरण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. जून 2014 मध्ये इस्रोला दिलेल्या भेटीवेळी शास्त्रज्ञांना याबाबतीत विनती केली होती, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. आपल्या भेटीनंतर सध्या विविध शासकीय विभागांमध्ये अंतराळ तंत्रज्ञान प्रणालीचा वापर वाढत आहे, असे ते म्हणाले. 2015 या चालू वर्षात केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांनी किमान एक तरी स्पेस ऍप्लीकेशन (अंतराळ तंत्रज्ञान) वापरण्याची सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली.

भारताच्या अंतराळ कार्यक्रमाविषयीच्या खर्चाबद्दल प्रसिध्द शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या शब्दांची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. साराभाई म्हणाले होते की, देशाच्या सामान्य नागरिकाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यात कोणतीही कसर सोडता कामा नये. विविध शासकीय विभागांमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. चांगल्या परिणामांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा व माहितीचा वापर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यसाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल याचे पंतप्रधानांनी अनेक दाखले दिले. मच्छिमारांसाठी निश्चित ठिकाण, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी सिंचनाच्या पायाभूत सुविधा, अवैधपणे सुरू असलेले उत्खनन अशी उदाहरणे त्यांनी दिली.

सुशासन, पारदर्शकता व जबाबदारी निश्चितीसाठी तंत्रज्ञान हेच सर्वात प्रभावी माध्यम असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सामान्य माणूस व अंतराळ संशोधन यात अंतर (स्पेस) असू नये असे पंतप्रधानांनी सांगितले.