पीएम्इंडिया
शिलाँगचे आर्चबिशप रेव्ह. डॉमनिक जाला यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
आर्चबिशप यांच्या निधनाने व्यथित झाल्याचे पंतप्रधानांनी ट्विट केले आहे. मोदी म्हणाले की, “समाजाची निःस्वार्थ सेवा आणि मेघालयच्या प्रगतीची आस याबद्दल डॉमनिक जाला कायम स्मरणात राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”
शिलाँगचे आर्चबिशप रेव्ह. डॉमनिक जाला यांचे 11 ऑक्टोबर 2019 रोजी अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया येथे एका कार अपघातात निधन झाले.
19 नोव्हेंबर 1977 रोजी त्यांना डॉन बॉस्कोच्या सेलेसियनचे पादरी नियुक्त करण्यात आले होते. डिसेंबर 1999 मध्ये शिलॉंगचे आर्चबिशप म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते गुवाहाटी प्रांतात होते.
**************
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
Anguished by the passing away of Most Rev. Dominic Jala, the Archbishop of Shillong. He will be remembered for his impeccable service to society and passion towards Meghalaya’s progress. May his soul rest in peace: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 12, 2019