Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्यासोबतच्या संयुक्त निवेदनादरम्यान पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

आदरणीय पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे, माध्यमांचे प्रतिनिधी, तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत! तसेच प्रा. मैत्री विक्रमसिंघे व त्यांच्या शिष्टमंडळातील सर्व सदस्यांचे स्वागत करतांना मला आनंद होत आहे.

मागील महिन्यात श्रीलंकेत झालेल्या संसदीय निवडणुकीत युनायटेड नॅशनल फ्रंट फॉर गुड गव्हर्नन्स अलायन्सच्या विजयाबद्दल अभिनंदन करु इच्छितो.

तुम्ही परदेश दौऱ्यासाठी सर्वात प्रथम भारताची निवड केली हा आम्ही आमचा सन्मान समजतो. तुमची मागची कारकीर्द व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार हा आनंददायी योगायोग होता.

भारत-श्रीलंका संबंधावर असलेला तुमचा विश्वास आणि खंबीर पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत. तुम्ही आमच्यासाठी मौल्यवान मित्र आहात. श्रीलंकेच्या विकासासाठीची तुमची निष्ठा व दूरदृष्टी भारतातही गौरवली जाते.

भारत-श्रीलंका संबंधांसाठी हे ऐतिहासिक वर्ष आहे, तसेच ते श्रीलंकेसाठीही आहे. फेब्रुवारीमध्ये अध्यक्ष सिरीसेना यांच्या पहिल्या परदेश दौऱ्याचे यजमान होण्याचा मान आम्हाला मिळाला. मार्चमध्ये मला श्रीलंका दौरा करण्याचे भाग्य मिळाले. सध्या, पंतप्रधान विक्रमसिंघे आमच्यासोबत आहेत.

श्रीलंकेने परिवर्तन, सुधारणा, सलोखा व विकासासाठी यावर्षी दोनवेळा मतदान केले आहे. श्रीलंकेच्या लोकशाही परंपरेसाठी यापेक्षा कोणते विधान मोठे असू शकत नाही. श्रीलंकेची शांतता, सर्वसमावेशक व भरभराटीच्या भविष्यासाठी यापेक्षा स्पष्ट संकेत दुसरा असू शकत नाही.

निकट शेजारी व मित्र राष्ट्र म्हणून आम्ही श्रीलंकेला यश, भरभराट चिंतितो, आणि भारताचा तुम्हाला सदैव पाठिंबा राहिल याची खात्री देतो.

श्रीलंका सरकारने नुकतेच काही महत्त्वपूर्ण पाऊल उचलली आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. नेतृत्वाने मोठ्या विश्वासाने कमालीचे राजकीय ऐक्य दाखवले आहे.

मला खात्री आहे की श्रीलंका आपल्या नेतृत्वाची हुशारी व इच्छाशक्तीच्या जोरावर तसेच लोकांच्या पाठिंब्यावर सर्वांगिण विकास साध्य करेल. जेणेकरुन, पूर्ण श्रीलंकन समुदाय यात श्रीलंकेतील तमिळ समुदायाचाही समावेश आहे, समानतापूर्वक, शांततापूर्वक, न्याय व गौरवासहीत राहिल.

तुमची प्रगती ही आपल्या दोन देशांसाठी महत्वाची आहे, दक्षिण आशिया आणि आपले सागरी क्षेत्र.

आम्हा दोघांदरम्यान आज चांगली चर्चा झाली.

मार्चपासून दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये झालेल्या सुधारणांचे आम्ही स्वागत केले, यात चलन विनिमय व्यवस्थेचाही समावेश आहे. काही महत्वाच्या द्विपक्षीय प्रकल्पांवर आणि प्रयत्नांवर नक्कीच प्रगती होईल, अशी आशा आम्ही व्यक्त केली.

आम्हा दोन्ही देशांना व्यापक अशी आर्थिक भागीदारी हवी आहे. आम्ही आमची व्यापारवृद्धी श्रीलंकेसाठी समतोल स्वरुपात झालेली पाहू इच्छितो. हे आमचे उद्दिष्ट खुल्या व स्पर्धात्मक भारतीय बाजारपेठेतून कसे साध्य करायचे यासंबंधी आमची चर्चा झाली. यात व्यापार व गुंतवणुकीसाठी द्विपक्षीय व्यवस्थेचाही समावेश होता.

भारतीय गुंतवणूकदार श्रीलंकेच्या आर्थिक विकासात योगदान देऊ इच्छितात यात प्रामुख्याने पायाभूत सुविधा, ऊर्जा व दळणवळण क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी श्रीलंकेने पाठिंबा द्यावा, अशी मागणी मी केली.

दोन्ही देशांदरम्यान दळणवळणाला भारताचा पूर्ण पाठिंबा असेल असे मी जाहीर केले जेणेकरुन दोन्ही देशांदरम्यानचे मानवी व आर्थिक संबंध दृढ होतील, त्याचा दोन्ही देशांना फायदा होईल.

मी विक्रमसिंघेंना आश्वस्त केले की, भारताचा विकासात्मक भागीदारीसाठी असलेला पाठिंबा कायम राहिल. पायाभूत सुविधांसाठी जसे-रेल्वे, ऊर्जा, समुदाय विकास प्रकल्प, कृषी, क्षमता निर्माण, विज्ञान व तंत्रज्ञान, अंतराळ आणि नागरी आण्विक क्षेत्रात सहकार्य.

दोन्ही देशांदरम्यानच्या जनतेचे परस्परांशी असलेले संबंध दृढ करण्यावर आम्ही भर देऊ. कसोटी क्रिकेटची मालिका नुकतीच संपली. आम्हाला क्रिकेटच्या मैदानावर कुमार संगकाराची उणीव नक्कीच जाणवेल.

परस्परांचे नजीकचे सुरक्षा संबंध आम्ही ओळखतो म्हणून या संवेदनशील विषयावर एकमेकांची चिंता जाणून घेणार आहोत. दोन्ही देशांदरम्यान संरक्षण व सुरक्षा सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

दहशतवाद निर्मुलनासाठी आम्ही परस्पर सहकार्य वाढवणार आहोत आणि सागरी प्रदेशात शांतता व स्थैर्य राहिल यासाठी एकत्र काम करणार आहोत. संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमात श्रीलंका आमचा सर्वात मोठा भागीदार देश आहे आणि या क्षेत्रात आमचे सहकार्य असेच वाढत राहणार आहे.

पंतप्रधानांसोबत मी मच्छीमारांच्या मुद्यावरही चर्चा केली. दोन्ही बाजूंकडील मच्छीमार संघटनांनी या मुद्यावर तोडगा काढावा याबाबत आमचे एकमत झाले.

हा मानवीय दृष्टीकोनातून पाहण्याचा मुद्दा आहे जो उदरनिर्वाहाशी संबंधित असल्याचे मी त्यांना सांगितले. खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी भारतीय मच्छीमारांसाठी घेतलेल्या निर्णयांबाबत मी त्यांना सांगितले.

थोडक्यात काय, तर भारत आणि श्रीलंका यांचा परस्परांच्या विकासात मोठा वाटा आहे, तसेच आपल्या प्रदेशातील स्थैर्य व विकासासाठीही आहे.

सर्वसामान्य भारतीय व श्रीलंकन नागरिकांच्या हृदयाला स्पर्शून जाणारे हे संबंध आहेत. तसेच दोन्ही देशांसाठी व्यूहात्मक रचनेच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. अध्यक्ष सिरीसेना व पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्यासोबतीने आम्ही भविष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो.

धन्यवाद.