Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्रीलंकेचे विदेशी व्यवहार मंत्री तिलक मारापना यांचा पंतप्रधान मोदी यांच्याशी दूरध्वनी द्वारे संवाद


श्रीलंकेचे विदेशी व्यवहार मंत्री तिलक मारापना यांनी आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला.

विदेशी व्यवहार मंत्री तिलक मारापना हे तीन दिवसांच्या द्विदेशीय भारत भेटीवर आहेत. तिलक मारापना यांनी नव्याने श्रीलंकेच्या विदेशी व्यवहार मंत्री पदाची जबाबदारी सांभाळल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले.

या वर्षी मे महिन्यात आंतरराष्ट्रीय वेसक दिनाच्या निमित्याने दिलेल्या श्रीलंका भेटीचा हि पंतप्रधांनानी उल्लेख केला. ते म्हणाले ही भेट फलदायी ठरली.

पंतप्रधानांनी श्रीलंके सोबत असलेल्या दृढ संबंधाचे खूप महत्व असल्याचे पुन्हा सांगितले . दोन्ही देश परस्पर संबंध मनवत असून श्रीलंकेचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या सह आम्हाला द्विपक्षीय सहकार्याला बळकटी आणि विस्तारण्यासाठी निरंतरपणे कार्य करायला आवडेल असे सांगितले.

पी आई बी/ बी. गोखले