पीएम्इंडिया
जमिनीची वाढती नापिकी वाळवंटीकरण रोखण्यासाठीच्या संयुक्त राष्ट्रांच्या सीओपी अर्थात कॉप 14 परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संबोधित करणार आहेत. उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोएडा येथे ही परिषद सुरु आहे. भारताने चीनकडून सीओपीचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. या परिषदेत, पर्यावरण विशेषत: भू व्यवस्थापनाशी संबंधित मुद्यांवर जागतिक स्तरावर उहापोह अपेक्षित आहे.
विविध देशांचे मंत्री, सरकारचे प्रतिनिधी, स्वयंसेवी आणि आंतर सरकारी संस्था, शास्त्रज्ञ, महिला, युवा अशा 7200 प्रतिनिधींचा सहभाग यात अपेक्षित आहे. दुष्काळ, वाळूची वादळं यासारख्या मुद्यांची दखल घेऊन जागतिक स्तरावर जमिनीच्या वापराची धोरणे दृढ करण्यासंदर्भात सुमारे 30 निर्णय यावेळी घेण्यात येतील.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
At 11:15 AM tomorrow morning, PM @narendramodi will address the 14th Conference of Parties (COP14) to UNCCD being held in Greater Noida, Uttar Pradesh. This conference will add to the global discourse on issues relating to the environment, especially land management.
— PMO India (@PMOIndia) September 8, 2019
This Conference is being held at a time when India has assumed the COP Presidency for two years.
— PMO India (@PMOIndia) September 8, 2019
India has had the honour to host the COP of all three Rio conventions on climate change, biodiversity and land.