Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संयुक्त राष्ट्र महासभेच्या नियोजित अध्यक्षांनी साधला पंतप्रधानांशी संवाद


संयुक्त राष्ट्र महासभेचे नियोजित अध्यक्ष आणि स्लोव्हाकचे परराष्ट्र आणि युरोपियन व्यवहार मंत्री मीरोस्लाव लाजॅक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला.

72व्या संयुक्त राष्ट्र संघ महासभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी मीरोस्लाव लाजॅक यांचे अभिनंद केले.

आगामी 72व्या संयुक्त राष्ट्र संघ महासभेसाठीचे आपले प्राधान्यक्रम त्यांनी पंतप्रधानांकडे विशद केले. नवी जबाबदारी निभावतांना मीरोस्लाव यांना भारताच्या संपूर्ण आणि भरीव सहकार्याची हमी पंतप्रधानांनी दिली.

दहशतवाद, संयुक्त राष्ट्रसंघ सुधारणा, शाश्वत विकासासाठीच्या उद्दिष्टांची अंमलबजावणी, हवामान बदल यांसारख्या जागतिक आव्हानांसंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या खंबीर कृतीच्या गरजेबाबतही उभय नेत्यांत चर्चा झाली.

B.Gokhale/N.Chitale/D.Rane