Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संरक्षण क्षेत्राची 73 चौरस मीटर भूमी “बेस्ट”ला भाडे तत्त्वावर देणार


संरक्षण खात्याच्या अखत्यारित असणाऱ्या मुंबईच्या नौसेनेच्या गोदी भागातील 73 चौरस मीटर भूमी बृहन्‌मुंबई विद्युत पुरवठा आणि वितरण (बेस्ट) कंपनीला भाडे तत्त्वावर देण्यात येणर आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा करार तीस वर्षांसाठी केला असून बेस्टकडून नाममात्र एक रुपया प्रतिवर्ष भाडे आकारण्यात येणार आहे. या भूमीवर विद्यु त वितरणासाठी चार संयंत्रांची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच जलसंचयाची भूमिगत सुविधा करण्यात येणार आहे.

या जमिनीवर केलेल्या बांधकामाचा खर्च बेस्ट करणार असून भारतीय नौसेनेवर याचा आर्थिक बोझा येणार नाही.

S.Bedekar/B.Gokhale