पीएम्इंडिया

संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व मुद्यांवर चर्चेला सरकार तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 30 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठकीला ते संबोधित करत होते.
देशातील सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर अधिवेशनात भर द्यायला हवा अशा बहुतांश सदस्यांच्या सूचनांचे पंतप्रधानांनी स्वागत केले.
ते म्हणाले, ‘बहुतांश सदस्यांनी देशाला भेडसावणाऱ्या आर्थिक स्थितीवर चर्चेची मागणी केली आहे. मी या सूचनांचे स्वागत करतो तुम्ही सर्वांनी सुचवलेल्या या आर्थिक समस्यांवर आपण चर्चा करायला हवी.’
सध्याच्या जागतिक आर्थिक स्थितीचा देशाला कसा लाभ मिळवता येईल याकडे लक्ष देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी सदस्यांना केले.
ते म्हणाले, ‘जागतिक स्थितीत भारताच्या बाजूने कशी वळवता येईल याकडे आपण लक्ष द्यायला हवे’
‘या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण देशाच्या अर्थव्यवस्थेला जर योग्य दिशा देऊ शकलो तर ते देशाच्या हिताचे असेल’ असे पंतप्रधान म्हणाले.
सदस्यांनी उपस्थित केलेल्या अन्य मुद्यांबाबत बोलतांना पंतप्रधान म्हणाले, ‘तुम्ही उपस्थित केलेल्या सर्व महत्वपूर्ण मुद्यांवर मी तुमच्याशी सहमत आहे या सर्व मुद्यांवर खुली चर्चा व्हायला हवी, असे मला वाटते.’
संसद आणि अधिवेशनाची उत्पादकता वाढवण्यात योगदान देण्याची विनंती त्यांनी सदस्यांना केली. मागील दोन अधिवेशनाचा संदर्भ घेत पंतप्रधान म्हणाले, ‘अधिवेशन आणि संसदेच्या उत्पादकतेसंदर्भात हे आहे. मागील दोन अधिवेशनात आपण उत्पादकतेत वाढ आणि यासंदर्भात जनतेचा वाढीव प्रतिसाद पाहिला. लोकप्रतिनिधी म्हणून सर्व मुद्यांवर खुलेपणाने चर्चा करून सदनाची उत्पादकता वाढवणे ही आपली जबाबदारी आहे.’
या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि व्ही. मुरलीधरन यांच्यासह सर्व पक्षांचे खासदार उपस्थित होते.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
Attended an all party meeting before the start of the budget session in parliament. pic.twitter.com/vwpEzk7L4L
— Narendra Modi (@narendramodi) January 30, 2020