Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संसदेच्या हिवाळी अधिवेशन 2015 च्या प्रारंभापूर्वी पंतप्रधानांनी संसद भवनाबाहेर माध्यमांशी साधलेला संवाद

संसदेच्या हिवाळी अधिवेशन 2015 च्या प्रारंभापूर्वी पंतप्रधानांनी संसद भवनाबाहेर माध्यमांशी साधलेला संवाद


नमस्कार सहकाऱ्यांनो/मित्रांनो, 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताच्या राज्य घटनेला स्विकृती दिली गेली. हा दिवस दरवर्षी “संविधान दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशभरात राज्य घटनेबद्दल जागरुकता वाढावी, विद्यार्थ्यांनी घटनेच्या प्रास्ताविकाचे वाचन करावे, आणि राज्य घटना हळू-हळू आपल्या जीवनाचा घटक बनावी, हाच आमचा प्रयत्न आहे. घटनेच्या निर्मितीत ज्या महापुरुषाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे, त्या बाबासाहेब आंबेडकराचे हे 125 वे जयंती वर्ष आहे, हे आमचे भाग्य आहे आणि हा योगायोग पण खूपच प्रेरीत करणारा आहे. आपण पाहिले असेल की, हा संसद भवनाचा परिसर खूप उजळला आहे. आणि मला विश्वास आहे की, या सत्रा दरम्यान, उत्तम विचार, उत्तम चर्चा, उत्तम नव-नव्या नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे संसदेचा अंतर्भागही चमकत राहिल.

सर्व राजकीय पक्षांच्या मान्यवरांशी काल माझी चर्चा झाली. खूप चांगली चर्चा झाली, चांगल्या वातावरणात झाली आणि सदनाचे कामकाज चांगल्या पध्दतीने व्हायला पाहिजे, याबाबत सर्वांचा एकमताचा सूर होता. चर्चेसाठी संसदेपेक्षा अधिक मोठे आणि चांगले केंद्र असूच शकत नाही. वाद व्हावे, विवाद व्हावे, चर्चा व्हावी हाच तर संसदेचा आत्मा आहे. बाकी कामांसाठी पूर्ण देशाचे मैदान उपलब्ध आहे आणि मला आनंद वाटतो की सर्व पक्षांनी वाद-विवाद आणि चर्चेसाठी सकारात्मक दृष्टिकोन मांडला. मला आशा आहे की, देशाची संसदेकडून जी अपेक्षा आहे, ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व संसदपटू कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही.

आज 26 नोव्हेंबर संविधान दिन. आमची राज्यघटना हा आशेचा किरण आहे, ती पथदर्श आहे. राज्यघटना आमचा मार्ग कायम प्रकाशित करत आहे आणि जेव्हा मी hope म्हणतो तेव्हा hope चा अर्थ एच म्हणजे सौहार्दता, ओ म्हणजे संधी, पी म्हणजे लोकांचा सहभाग आणि ई म्हणजे समानता असा आहे. खूप-खूप धन्यवाद मित्रांनो.

J.Patnakar/S.Tupe/N.Sapre