Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी संसद भवनाबाहेर पंतप्रधानांचा प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी संसद भवनाबाहेर पंतप्रधानांचा प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद


मित्रहो सुप्रभात,

शक्यतो दिवाळीसोबतच थंडीचे दिवसही सुरु होतात. मात्र जागतिक तापमानवाढ आणि वातावरणातील बदलांच्या परिणामी अजून फारशी थंडी जाणवत नाही.

मात्र आपले हिवाळी अधिवेशन सुरु होते आहे. 2017 साली सुरु होणारे हे हिवाळी अधिवेशन 2018 मध्येही सुरु राहिल, असा मला विश्वास वाटतो. दुरगामी परिणाम करणारे महत्वपूर्ण विषय या सदनात पटलावर येतील, त्यावर चांगली आणि सकारात्मक चर्चा होईल, नाविन्यपूर्ण सूचनांचा त्यात समावेश असेल आणि संसदेचा वेळ देशासाठी सत्कारणी लागेल, असे मला वाटते.

काल सुद्धा आमची सर्वपक्षीय बैठक झाली, त्यातही देशाला प्रगती पथावर नेण्याच्या दिशेने सदनाच्या या अधिवेशनाचा सकारात्मक वापर व्हावा, असाच सुर होता. संसदेचे हे हिवाळी अधिवेशन सकारात्मक असेल, त्यामुळे देशाला लाभ होईल, लोकशाही अधिक सक्षम होईल आणि सर्व सामान्य नागरिकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करता येतील, असा विश्वास प्राप्त होईल, असे मला वाटते.

अनेकानेक आभार.

N.Sapre/M.Pange/D.Rane