पीएम्इंडिया
संसद भवन परिसरात पार पडलेल्या रेट्रोफिट इलेक्ट्रिक बस प्रात्यक्षिक समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित होते. या डिझेल बसचे रुपांतर बॅटरीचलित विद्युत बसमध्ये करण्यात आले आहे. संसद सदस्यांना स्वच्छ प्रदूषण विरहीत वाहतूक पुरवण्याच्या उद्देशाने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा उपक्रम हाती घेतला.
पंतप्रधानांनी या बसची पाहणी केली आणि नंतर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे या बसच्या चाव्या सुपूर्द केल्या.
याप्रसंगी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, पर्यावरणाबाबत संपूर्ण जगभरात बऱ्याच कालावधीपासून चर्चा होत आहे परंतु मागील काही वर्षांपासून सामान्यांच्या आयुष्यावर याचे विपरित परिणाम दिसून येतात.
पंतप्रधानांनी यावेळी पॅरिसमधील सीओपी 21 परिषदेचा पुनरुच्चार करुन यातील दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांची आठवण करुन दिली. “नाविन्य अभियान” हा एक उपक्रम जो हरित तंत्रज्ञानाच्या विकासासाठी अमेरिका, फ्रान्स आणि भारत एकत्रितपणे राबवत असून याकरिता बिल गेट्स संस्थादेखील मदत करत आहे. दुसरा उपक्रम म्हणजे ज्या देशांमध्ये मुबलक सूर्यप्रकाश आहे त्या देशांची एक आंतरराष्ट्रीय ऊर्जा संघटना स्थापन करणे. या संघटनेचे मुख्यालय हे दिल्ली येथे असणार आहे.
ही बस सुरु केल्याबद्दल पंतप्रधानांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले. भारतामध्ये अशा प्रकारच्या स्वस्त आणि कार्यक्षम विद्युत बॅटरी निर्माण करण्याचे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी उद्योजकांना केले. यामुळे स्वच्छ सार्वजनिक वाहतूकीचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.
याप्रसंगी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, व्यंकय्या नायडू , प्रकाश जावडेकर आणि मोठया प्रमाणात संसद सदस्य उपस्थित होते.
S.Mhatre/S.Tupe/M.Desai
In Paris during #COP21, leaders of the world came together & focus was placed on innovation (in energy): PM @narendramodi @India4Climate
— PMO India (@PMOIndia) December 21, 2015
Another initiative, where India played a key role, is solar alliance. It consists of nations blessed with lot of sunlight: PM @India4Climate
— PMO India (@PMOIndia) December 21, 2015
This bus here (launched today), it is not making noise and scope of pollution also does not arise: PM @narendramodi https://t.co/ztQyG5hBNU
— PMO India (@PMOIndia) December 21, 2015
The Retrofit Electric Bus launched in Parliament today is a part of our larger efforts to create clean public transport & minimise pollution
— Narendra Modi (@narendramodi) December 21, 2015
Retrofitted Electric Bus is cost effective & is at the core of @makeinindia initiative- @isro is making Lithium–Ion batteries.
— Narendra Modi (@narendramodi) December 21, 2015
Highlighted why clean energy matters & key outcomes of #COP21 to mitigate #ClimateChange. @COP21 @India4Climate https://t.co/cOS5SqWNNR
— Narendra Modi (@narendramodi) December 21, 2015