Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सचिवांच्या दोन गटातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या कल्पना आणि सूचना सादर

सचिवांच्या दोन गटातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या कल्पना आणि सूचना सादर


विविध विभागात परिवर्तनीय बदल घडवून आणण्यासाठी नवनवीन कल्पना आणण्याच्या पंतप्रधानांच्या सूचनेला प्रतिसाद देत सचिवांच्या दोन गटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कल्पना आणि सूचना सादर केल्या . “अभिनव अर्थसंकल्प आणि प्रभावी अंमलबजावणी ” तसेच “स्वच्छ भारत आणि गंगा पुनुरुज्जीवन” याविषयावर सचिव गटांनी आपल्या कल्पना आणि सूचना सादर केल्या.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, अरुण जेटली, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, मनोहर पर्रीकर, तसेच केंद्र सरकारचे सर्व सचिव यावेळी उपस्थित होते. सादरीकरणादरम्यान आणि त्यानंतरही पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्र्यांनी सादरीकरणाच्या संकल्पनेबाबत प्रश्न विचारले आणि आपल्या सूचना नोंदवल्या.

यापूर्वी सचिवांच्या पहिल्या गटाने १२ जानेवारी रोजी ऊर्जा संवर्धन आणि कार्यक्षमतेबाबतच्या आपल्या कल्पना आणि सूचना पंतप्रधानांसमोर सादर केल्या.

S.Tupe/M.Desai