पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने “इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)” आणि “चार्टर्ड प्रोफेशनल अकाउंटंट्स ऑफ इंडिया (सीपीए)” यांच्यातील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.
विवरण :
मंत्रिमंडळाने 2011 मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराला ही कार्योत्तर मंजुरी दिली आहे या करारांतर्गत परस्पर सदस्यत्वासाठी व्यवस्थेची तरतूद आहे जी विशिष्ट निकषांनुसार दोन्ही संस्थांच्या संबंधित सदस्यांना लागू असेल. या करारात परिभाषा . शिक्षण याबाबत सहकार्य तसेच चार्टर्ड अकाउंटेंट प्रवेश स्तराच्या व्यावसायिक गुणवत्ता, कौशल्य आणि क्षमता यांचे मूल्यांकन समाविष्ट आहे.
प्रभाव :
याचा उद्देश आईसीएआआयचे सदस्य, विद्यार्थी आणि त्यांच्या संस्थांच्या व्यापक हितासाठी परस्पर लाभदायक संबंध विकसित करणे हा आहे. हा करार आयसीएआयच्या सदस्यांना त्यांचे व्यावसायिक क्षितिज विस्तारण्याची संधी उपलब्ध करेल. त्याचबरोबर आयसीएआय स्थानिक देशांच्या ब्रॅण्ड निर्मितीला बळकट करणारी संस्था बनेल. या करारामुळे आयसीएआय आणि सीपीए कॅनडा दरम्यान मजबूत कार्य संबंध विकसित होतील.
लाभार्थी :
हा करार अधिकाधिक युवा भारतीय चार्टर्ड अकाउंटेंटना सीपीए कॅनडातून व्यावसायिक मान्यता मिळवण्यासाठी प्रोत्साहित करेल आणि त्यांना कॅनडामध्ये व्यावसायिक संधी शोधण्यात मदत करेल. अनेक भारतीय चार्टर्ड अकाउंटेंट कॅनडातील कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडे सीपीए कॅनडाची मान्यता आहे. कॅनडातील कंपन्यांचा भारतीय गुणवत्ता आणि कौशल्यावरील विश्वास वाढेल आणि तिथल्या कंपन्या त्यांना नियुक्त करण्यासाठी पुढे येतील.
अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्टे
हा करार त्या सदस्यांना लागू होईल ज्यांनी आयसीएआय अथवा कॅनेडिअन प्रोव्हिन्शिअल सीपीए संस्थामधून आवश्यक शिक्षण , परीक्षा आणि प्रायोगिक अनुभव प्राप्त केले आहे. हा करार त्या व्यक्तींना लागू होत नाही ज्यांनी तिसऱ्या पक्षाबरोबर करार करून आयसीएआय किंवा कॅनेडिअन प्रोव्हिन्शिअल सीपीएचे सदस्यत्व मिळवले आहे.
B.Gokhale/S.Kane/Dinesh