पीएम्इंडिया
सफाई कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय आयोगाच्या कार्यकाळात 31-3-2016 च्या पुढे तीन वर्षांची वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
सफाई कर्मचारी तसंच मैला वाहून नेण्याशी संबंधित व्यक्तींना या प्रस्तावाचा लाभ होणार आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी हा आयोग सरकारला शिफारसी करण्याबरोबरच सध्याच्या कल्याणकारी कार्यक्रमांचं मूल्यमापन आणि त्यांचा अभ्यासही करतो. वाढीव तीन वर्षाच्या कालावधीसाठी सुमारे 13.08 कोटी रुपये एकूण खर्च अपेक्षित आहे.
N. Chitale / S.Tupe / M. Desai