Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सर्वोच्च उदाहरण सादर करत पंतप्रधानांनी मामल्लापुरम समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता राखली


स्वच्छ भारतासाठी प्रयत्नशील असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशासमोर एक उदात्त उदाहरण ठेवले. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करायला हवेत. हे स्वत:च्या कृतीने दाखवून दिले.

मामल्लापुरम समुद्रकिनाऱ्यावर सकाळी फेरफटका मारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे ३० मिनिटाहून अधिक काळ तिथे पडलेला प्लास्टिक आणि अन्य कचरा उचलला.

नंतर त्यांनी ट्विट केले, “आज सकाळी मामल्लापुरम किनाऱ्याचा परिसर स्वच्छ केला. तिथे सुमारे 30 मिनिटांपेक्षा अधिक वेळ होतो. तिथला प्लॅस्टिक कचरा गोळा करून हॉटेलचे कर्मचारी जयराज यांच्याकडे दिला. आपली सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ आणि नीटनेटकी राहतील याकडे लक्ष देऊया. तसेच आपण तंदुरुस्त आणि निरोगी राहूया.”

**************

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar